Friday, May 31, 2024

कवडी

समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मीमातेची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मीमातेची उत्पत्ती समुद्रातूनच झालेली आहे. कवडीला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.

कवड्यांचे प्रकार किती व कोणते?

- Advertisement -

तसे पाहता बर्‍याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात. परंतु पुजेमध्ये अथवा देवी शृंगारांमध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश होतो.

1) महालक्ष्मी कवडी – कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.

2) आंबिका बट कवडी – खडबडीत व पिवळसर रंगाची

3) येडेश्वरी कवडी – राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा

4) यल्लम्मा कवडी – शुभ्र व दुधासमान निष्कलंक

आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. कवडी माळ जी आई भवानीसह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे.

कवडीच्या महात्म्याच्या कथा – शिव पार्वती सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण? त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंंद्र देवांच्या दरबारी

पोहोचले. तिथे कवडीतूल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसर्‍या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले. पण कवडीतूल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वत:चा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीला तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिव-शक्ती समीप आले. अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ इंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे इंद्र व चंद्र देवानी बांधले असुन ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतिर्थांना येथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तीर्थ होय तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले.

एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.

- Advertisment -

ताज्या बातम्या