Sunday, September 27, 2026
Homeदेश विदेशLal Krishna Advani: भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली

Lal Krishna Advani: भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. अडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांत चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, लाल कृष्ण अडवाणी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातून माहिती मिळाल्यानुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्याबाबतीत लवकरच बुलेटीन जारी करण्यात येईल. गेल्या ४-५ महिन्यांत ही चौथी वेळ आहे की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी आडवाणींना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३ जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी २६ जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेले. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

ताज्या बातम्या

विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, “2027 चा विश्वचषक हा…”

0
मुंबई । Mumbai भारतीय क्रिकेट संघाला कठीण प्रसंगातून अनेकदा विजयपथावर नेणारा आणि मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli)...