Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापुढच्या वर्षी लवकर या…! भावूक वातावरणात लालबागच्या राजाला निरोप

पुढच्या वर्षी लवकर या…! भावूक वातावरणात लालबागच्या राजाला निरोप

मुंबई | Mumbai

करोनाच्या (corona) २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या जल्लोषात पार पडला…

- Advertisement -

मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) निरोप घेतो देवा आता..आज्ञा असावी…चुकले असेल काही तर माफी असावी…असे म्हणत गणेशभक्तांनी निरोप दिला.

तब्बल २४ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाला विसर्जन सोहळा (Immersion Ceremony) पार पडला.

ही मिरवणूक शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मार्गस्थ झाली होती. यावेळी शेकडो गणेशभक्त सहभागी झाले होते. समुद्राचे (sea) पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली.

दरम्यान, लालबागच्या राजाचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील (Mumbai) गणपतीचे विसर्जन संपूर्ण झाल्याचे मानले जाते. तसेच १० दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघाल्याने गणेशभक्त भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या