Monday, May 27, 2024
Homeनगरजमिनीच्या वादातून झाडांची कत्तल; महिलेचा विनयभंग

जमिनीच्या वादातून झाडांची कत्तल; महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील (Ahmednagar) एका गावात जमिनीच्या वादातून (Land Dispute) संत्राच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल (Trees Slaughter) रोखण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग (Woman Molested) केल्याचा प्रकार घडला असून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कलेक्टर कचेरीत आता कागदी टपालाला नो-एन्ट्री

नितीन राजेंद्र शिंदे, राजेंद्र आंबादास शिंदे (रा. शिंदे मळा, अरणगाव ता. नगर) अशी गुन्हा दाखल (Filed a Case) झालेल्यांची नावे आहेत. शनिवार (दि. 14) दुपारी फिर्यादी व त्यांचे पती घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती घरासमोरील शेतातातील संत्रा झाडाचे कत्तल (Trees Slaughter) करतांना दिसले. त्यांना विचारले असता, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून झाडांची कत्तल करता असे म्हणताच राजेंद्र शिंदे व नितीन शिंदे यांनी झाडे तोडण्याचे सांगितले.

फळबाग लागवडीसाठी मिळणार सुधारित अनुदान

त्यावेळी फिर्यादी म्हणाल्या की झाडे तोडू नका आमचे जमिनीचे वाद आहे. असे सांगण्यासाठी गेले असता नितीन शिंदे याने शिवीगाळ करत विनयभंग (Woman Molested) केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

15 गुन्हे असलेला सराईत गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या