Wednesday, September 11, 2024
Homeनगरजागेच्या वादातून तरूणावर रॉडने हल्ला

जागेच्या वादातून तरूणावर रॉडने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहत्या जागेच्या वादातून तरुणाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हातमपुरा चौक, डावरे गल्लीत घडली. महेश गोविंद मिसाळ (वय 37 रा. माणिक चौक, माणकेश्वर गल्ली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे महेश यांचे चुलत भाऊ आहे.

- Advertisement -

योगेश गोपिनाथ मिसाळ, रमेश गोपिनाथ मिसाळ, आनंद गोपिनाथ मिसाळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी दूध व्यवसाय करतात. ते जुन्या वाड्यात राहत असून तेथेच त्यांचे चुलत भाऊ योगेश, रमेश व आनंद हे राहतात. त्यांच्यात राहत असलेल्या वाड्याचे कारणावरून जुने वाद आहेत. मंगळवारी सायंकाळी फिर्यादी हातमपुरा चौक, डावरे गल्ली येथे गणपती स्थापनेचा कार्यक्रम पाहत असताना योगेश, रमेश व आनंद तेथे आले.

त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. फिर्यादी त्यांना समजून सांगत असताना त्यांना अधिक राग आला व त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. दरम्यान, फिर्यादीला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे वडिल घटनास्थळी आले असता मारहाण करणारे तिघे तेथून निघून गेले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या