Saturday, July 27, 2024
HomeनाशिकTrimbakeshwar News : दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी फुलली

Trimbakeshwar News : दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी फुलली

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Mandir) येथे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. त्यातही श्रावणमास सुरु झाला की, भाविकांच्या संख्येत नेहमीपेक्षा अधिक वाढ होते. अशातच आज श्रावण महिन्यातील (Shravan Month) दुसरा श्रावण सोमवार असल्याने त्र्यंबकनगरी (Trimbakeshwer) भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा होणार सुरु

रविवार (दि.२७) रोजी दुपारपासूनच भाविकांनी त्र्यंबकेश्वरला गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आज सकाळी चार वाजेपासून येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. तर मागील सोमवारी (दि.२१) रोजी नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळत होती. मात्र, आज दुसरा सोमवार असल्याने भाविकांची काही प्रमाणात गर्दी झाली आहे.

Chandrashekhar Bawankule: “…तर ईट का जवाब पत्थर से देऊ”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

त्यामुळे देवस्थान ट्रस्टकडून व्हीआयपी प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तसेच श्रावण महिन्यात त्र्यंबकमध्ये व्हीआयपींना प्रवेश नसला तरी शासकीय व्हीआयपींना प्रवेश देण्यात येत असून देवस्थान ट्रस्टकडून मंदिर परिसरातील कोठी कार्यालयालगत विशेष व्हीआयपी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या व्हीआयपी कक्षाला जोडूनच आरोग्य सेवा कक्ष देखील सुरु करण्यात आला असून भाविकांच्या विश्रांतीसाठी मंदिराच्या आवारात एक मंडप उभारण्यात आला आहे.

ठरलं! गणेश चतुर्थीला Jio AirFibre लॉन्च होणार, मुकेश अंबानींची घोषणा

दुसरीकडे ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी (Circling Brahmagiri) नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील पेगलवाडी फाट्यापर्यंत जागोगाजी भाविकांची गर्दी दिसत आहे. तर रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांच्या (Vehicles) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच प्रदक्षिणा मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचे (Police) पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एखादा भाविक आजारी पडल्यास त्याच्या मदतीसाठी आरोग्य विभागाकडून (Department of Health) प्रदक्षिणा मार्गावर डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांच्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Neeraj Chopra : “मी स्वत:ला…”; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

- Advertisment -

ताज्या बातम्या