Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : लेझर लाईट, दबाव हॉर्नवर बंदी

Ahilyanagar : लेझर लाईट, दबाव हॉर्नवर बंदी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश नगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद 2025 या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साईड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश 8 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी राहणार आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साईड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः अशा साधनांच्या वापरामुळे मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्यांवर तसेच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते, यामुळे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...