Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकमुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी अखेरचे चार दिवस

मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी अखेरचे चार दिवस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. इच्छुकांनी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे (Dr. Dinesh Bhonde) यांनी केले आहे…

- Advertisement -

एम.बी.ए. प्रवेश परीक्षेची (Entrance exams) प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षीपासूनच्या नव्या अभ्यासक्रमांमध्ये एम. ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, एम.लिब.), एम. एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र), एम.कॉम, एम.बी.ए., एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.सी.ए. या पदवी अभ्यासक्रमांबरोबरच ग्रंथालय व माहितीशास्त्र,

जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या हे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि मराठी व उर्दू माध्यमातून कला शाखेतील पदवी, बी.कॉम. (मराठी व इंग्रजी माध्यम), बी. कॉम. ( सहकार व्यवस्थापन). बी.बी.ए., बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), बी.बी.ए. (बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंन्ट), बी.एस्सी. (कॉम्प्युटर सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेशन) हे पदवी शिक्षणक्रम सुरू झाले आहेत.

यासोबतच शालेय व्यवस्थापन, लॅब टेक्निशियन, योगशिक्षक, इंटेरियर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन, इलेक्ट्रिशियन अ‍ॅण्ड डोमेस्टिक ॲप्ली. मेन्टनन्स, सिव्हिल सुपरवायझर, ॲनिमेशन, कृषी अधिष्ठान, संमंत्रक प्रशिक्षण या शिक्षणक्रमांचेदेखील प्रवेश सुरू झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या