Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रLata Mangeshkar यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा, राज्यात आज सार्वजनिक सुट्टी; काय सुरू,...

Lata Mangeshkar यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा, राज्यात आज सार्वजनिक सुट्टी; काय सुरू, काय बंद?

मुंबई | Mumbai

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर ( Maharashtra Government Public Holiday) केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज बंद ठेवले जातील. मात्र, केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील बँका सुरु राहतील का नाही, यासंदर्भात अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) अखत्यारित एसबीआय, बँक ऑफ इंडिया या सरकारी आणि इतर खासगी बँका येतात. म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारचे निर्णय लागू होत नाही. केंद्र सरकारनेही तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. त्यामुळे आता आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे.

आरबीआयने म्हटलं (Rbi On Public Holiday) की, महाराष्ट्र वगळून देशातील बँका आज सुरु राहतील. महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले. त्याचसोबत, पेंडिंग व्यवहार ८ फेब्रुवारीला पुर्ण करण्यात येतील, असेही आरबीआयने सांगितले आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील इतर न्यायालयांना आज सुट्टी असेल.

म्हाडा भरती परीक्षा होणार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी ही दिली.

म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सुरू आहे. याआधी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. म्हाडा भरती परीक्षा सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती म्हाडाने दिली असून परीक्षार्थींनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर मार्केट सुरु राहणार

आज बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे अशी माहिती BSCकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या