Wednesday, May 22, 2024
Homeजळगावलता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात!

लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात!

औरंगाबाद Aurangabad ।

चोपड्याच्या शिवसेना आमदार लता सोनवणे (Shiv Sena MLA Lata Sonawane) यांची आमदारकी धोक्यात (MLAs in danger) आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) सोनवणे यांची जातवैधता प्रमाणपत्र याचिका फेटाळली (Caste certificate validity petition rejected) आहे. त्यावेळी लता सोनवणे यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई करु नये, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जात प्रमाणपत्र अनुसूचित जमाती तपासणी समितीने (Scheduled Tribes Inspection Committee) रद्द (Canceled) केले होते. सोनवणे यांनी सादर केलेले प्रमाणपत्र चुकीचे असल्याचा एकमुखी निर्णय समिती सदस्यांनी दिला होता. समितेने लता यांनी आमदार म्हणून मिळवलेल्या लाभांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात लता सोनवणे यांनी कोर्टात याचिका (Petition in court) दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्याने सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे.

लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्रबाबत चोपड्याचे माजी आमदार जगदीश रमेश वळवी आणि अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार केली होती. त्यांनी आमदार लता सोानवणे यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने चौकशीकरुन प्रमाणपत्र अवैध (Certificate invalid) असल्याचे घोषित केले होते. समितीच्या निर्णयाविरुद्ध आमदार लता सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने 3 डिसेंबर 2020 ला समितीचा आदेश रद्दबातल करुन आमदार सोनवणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणजेच अमळनेरचे उपविभागीय अधिकारीकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.

कोर्टाच्या आदेशानंतर आमदार लता सोनवणे यांनी सक्षम प्राधिकारीकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर ते पुन्हा समितीकडे पाठवले. पण समितीकडे पाठवलेल्या काही कागदपत्रांमध्ये नवे दस्ताऐवज होते. त्यामुळे त्याची सत्यता तपासणीसाठी हे प्रकरणं पोलीस दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले. पोलीस दक्षता पथकाने (Police Vigilance Squad) तपास केला असता तिथे आमदार सोनवणे टोकरे कोळी जातीचेच असल्याचे सिद्ध करु शकल्या नाहीत. दरम्यान, संबंधित प्रकरण हे गेल्या काही दिवसांपासून न्यायप्रविष्ट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या