Thursday, November 14, 2024
Homeनगरनगरच्या पालकमंत्रीपदास ना. थोरातांचा नकार

नगरच्या पालकमंत्रीपदास ना. थोरातांचा नकार

पुणे (प्रतिनिधी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारण्याबाबत नकार दिला आहे. मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं नाही, तरीही पालकच आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, काळाच्या ओघामध्ये राजकारणाला थोडा वेग आला आहे. तिन्ही पक्ष मिळून एकत्र आले आहे. जागा कमी असल्याने काही इच्छुकांना मंत्रिपद देऊ शकलो नाही, हे वास्तव आहे. नाराज नेत्यांनी थोडे समजून घेतले पाहिजे, असं आवाहनही थोरात यांनी केले. भाजप नेत्यांची अवस्था बिकट आहे. सत्ता न मिळाल्याने पाण्याबाहेर मासा तडफड करतो, तशी अवस्था विरोधकांची झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

मंत्रीपदासाठी काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल बंडाच्या भूमिकेत असल्याबद्दल विचारले असता, ना. थोरात म्हणाले, कैलास गोरंट्याल यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची नाराजी दूर होईल आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या