Friday, October 4, 2024
Homeनगरराज्याला १ लाख ४० हजार कोटींचा बसणार फटका ; तज्ज्ञगट समितीच्या अहवालातील...

राज्याला १ लाख ४० हजार कोटींचा बसणार फटका ; तज्ज्ञगट समितीच्या अहवालातील आकडेवारी

मुंबई – करोनाला रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञगटाची निवड केली होती. या समितीने आता आपला अहवाल शुक्रवारी सादर केला आहे. या अहवालातून समितीने राज्य सरकारला भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली आहे. तसंच काही महत्त्वाचे सल्लेदेखील दिले आहेत. राज्याच्या महसूलात १ लाख ४० हजार कोटींचा फटका बसण्याचा निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे.

तज्ज्ञगटाच्या अहवालातील काही मुद्दे –
१. करोना संकटानंतर अर्थव्यवस्था कशा स्वरुपात उभारायची याबाबत तज्ञांचा सल्ला
२. राज्याची कर्ज घेण्याची क्षमता ३ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्याची शिफारस
३. बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा प्रकल्प, वाहतूकसारखे महसूल मिळवून देणारे प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची शिफारस
४. दोन चाकीवर एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा, चार चाकी गाडीत दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा द्यावी अशी सूचना
५. बसमध्ये सँनिटायझर असावे, प्रवासात मास्क वापरणं बंधनकारक
६. उद्योगाच्या ठिकाणी तापमान तपासणे, करोनाची लक्षणं आढळल्यास रुग्णांची तपासणी करण्याची सूचना
७. मानसिक रोग बळावण्याची शक्यता असल्यानं राज्य पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्याची शिफारस
८. मेट्रो, रस्त्यांचे प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची सूचना
९. जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी क्षेत्रासाठी कंट्रोल रुम सुरू करण्याची शिफारस
१०. मुंबईतल्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची सूचना
११. कामगार उपलब्ध करुन देण्यासाठी पावलं उचलण्याची गरज
१२. वस्तूंची ने आण करणार्‍या वाहतुकीची विनाअडथळा सुविधा
१३. केंद्राकडे विशेष कोव्हीड पॅकेज मागण्याची सूचना

- Advertisment -

ताज्या बातम्या