Saturday, November 16, 2024
Homeनगरकमऑन नगरकर ; महापालिका राज्यात टॉपर

कमऑन नगरकर ; महापालिका राज्यात टॉपर

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण झाल्यानंतर आता नागरिकांच्या फिडबॅकचा टप्पा सुरू झाला आहे. आज दुपारपर्यंत नगरकरांनी स्वच्छतेमध्ये महापलिकेला ‘प्लस’ दिल्याने नगर दुपारपर्यंत राज्यात नंबर वन ठरले आहे. आणखी नगरकरांचा सहभाग नोंदविण्यासाठी महापालिकेने ‘कमऑन नगरकर’ नारा देत प्रतिसादासाठी जागृती सुरू केली असल्याची माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली.

गत महिनाभरापासून नगरमध्ये महापालिकेने स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली. महापौर, नगरसेवक अन् अधिकारीही रस्त्यावर झाडू घेऊन उतरले. केंद्रीय समितीने चार दिवस नगरची पहाणी केली आहे. स्वच्छतेसंदर्भात थेट नगरकरांना प्रश्‍न विचारत त्यांनाही सहभागी करून घेतले आहे. नगरकर जितका सकारात्मक प्रतिसाद देतील तितकी नगर महापालिका टॉपवर जाणार आहे.

- Advertisement -

स्वच्छ सर्वेक्षणात चार प्रकारे नगरकरांना फिडबॅक देता येणार आहे. स्वच्छता अ‍ॅप, वेब पोर्टल, थेट कॉल करून आणि व्होट फॉर सिटी अ‍ॅप माध्यमातून नगरकरांना प्रतिक्रिया देण्याची सुविधा स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत निर्माण करून देण्यात आली आहे. दुपारपर्यंत 11 हजार 969 नगरकरांनी स्वच्छतेसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने नगर महापालिका राज्यात नंबर वन झाल्याची माहिती उपायुक्त पवार यांनी दिली.

दोनशे कर्मचारी दारोदारी…
स्वच्छतेसदंर्भात फिडबॅक देण्यासाठी महापलिकेने प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांच्या 90 टिम्स तयार केल्या आहेत. प्रत्येक टिमला रोज 100 फिडबॅकचे टार्गेट देण्यात आले आहे. 31 जानेवारीपर्यंत हे व्होटींग सुरू राहणार असून जास्तीजास्त नगरकरांनी सहभाग घेऊन सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्रभाग समितीनिहाय या टिम दारोदारी फिरून फिडबॅकची जनजागृती करत असल्याची माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली.

नगर महापालिका 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या स्वच्छता सर्वेक्षणात सहभागी झाली आहे. 2019 मध्ये नगर महापालिका देशात 274 व्या स्थानावर होती. यंदाची स्वच्छता मोहीम पाहता नगर देशात शंभरच्या आतमध्ये येईल.
– सुनील पवार, उपायुक्त, महापालिका.

सिटीझन फिडबॅक दुपारपर्यंत

व्होट फॉर सिटी अ‍ॅप 11172
पार्टलवर                    571
थेट कॉल                     49
स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिसाद 177

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या