दिल्ली – जगभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दहा लाखाच्या वर गेली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर औषध बनविण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. कोरोनाचा जन्मदाता चीन व प्रतिस्पर्धी अमेरिका या दोन्ही देशात कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला जात आहे.
अमेरिकेने लस विकसित केल्याचा दावा करत १७ मार्च पासून मानवावर चाचणीला सुरुवात केली आहे. तसेच चीन मधील औषध लष्करी अॅकॅडमी आणि चिनी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअर्स यांनी संयुक्त पणे लस विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यांनी चाचणी केलेले १४ रुग्ण घरी बरे होऊन घरी गेले असून त्यांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना कोरोनाबाबत सतत इशारा देत आहे. कोरोनावरील लस बाजारात येईपर्यंत लोकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारी संरक्षणात्मक उपाययोजना जास्त संख्येने कराव्यात. असे आवाहन संघटनेने केले आहे.