Sunday, April 27, 2025
Homeमुख्य बातम्याराज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादीच्या फौजिया खान

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादीच्या फौजिया खान

मुंबई – महाविकास आघाडीच्या गोटातील राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रामधल्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून फौजिया खान उमेदवारी अर्ज भरणार आहे.

राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या सात जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहे. काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत.

- Advertisement -

चौथ्या जागेबाबत महाविकासआघाडीत रस्सीखेच होती, पण महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अखेरीस तोडगा काढण्यात आला आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादीकडून फौजिया खान आणि शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आज अर्ज भरणार आहेत. यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असून 26 मार्चला केवळ मतदानाची औपचारिकता असेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...