नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये वर्षाच्या सुरवातीलच भयानक आगीने थैमान घातले आहे. या आगीत माणसाबरोबर मुक्या जीवांचाही बळी गेला आहे.
दरम्यान दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील ‘फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क’ कांगारू बेट भागात हि आग लागली असून या आगीत १४ हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात हि आग लागली असून अद्याप २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे ४८ कोटी प्राण्यांचा आणि पक्षांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याला या वणव्यांचा सर्वात जास्त फटका बसला आहे. येथील मोठा भूभाग या आगीच्या विळख्यात सापडला होता. कोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ, वाढलेलं तापमान आणि जोरदार वारे या सर्व गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणून हे वणवे लागत आहेत आणि इतरत्र पसरत आहेत.
येथील परिस्थिती आटोक्यात आणायची ऑस्ट्रेलिया सरकार पर्यटनशील असून येथील परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. यासाठी जागतिक स्तरावरही मदतीचा ओघ सुरु आहे.