Monday, November 25, 2024
Homeदेश विदेशअयोध्या : मशिदीमुळे रोहनाई गाव येणार नकाशावर

अयोध्या : मशिदीमुळे रोहनाई गाव येणार नकाशावर

अयोध्या । अयोध्येपा सून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर रोहनाई हे छोटेसे गाव. राम मंदिराच्या निर्णयानंतर हे गाव अचानक प्रकाश झोतात आले. शासनाने या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा दिली आहे. मशीद झाल्यावर या ठिकाणी वेगाने विकास होइल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

अयोध्या (पूर्वीचा फैजाबाद ) व लखनौ महामार्गावर उजव्या हाताला धनीपूर व रोहनाई ही गावे. या दोन्ही गावांच्यामध्ये उत्तरप्रदेश सरकारच्या कृषी विभागाची 120 बिगे शेतजमीन आहे. त्यावर सध्या गहू लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी 20 बिघा म्हणजे पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात आली आहे. साधारण 15 हजार गावची लोकसंख्या असून त्यापैकी 60 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे.

- Advertisement -

मुस्लिमबहुल गावात जमीन देऊन भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता सरकारने घेतल्याचे दिसते. शेती व छोटी मोठी कामे करुन गावातील लोक उपजिविका चालवतात. गावात मशिदीसाठी जागा देण्याचे स्वागत करतात. हिंदू समाजानेही त्यास विरोध दर्शवला नाही. मशिदीमुळे अयोध्येप्रमाणे रोहनाई गाव पर्यटनाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर येईल. पायाभूत सुविधांचा विकास होऊन अर्थकारणाला गती मिळेल व गावाचा विकास होईल, असे स्थानिकांना वाटते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या