Tuesday, May 21, 2024
Homeनगरभाजपच्या नगर शहरजिल्हाध्यक्ष निवडीसाठी बागडे निरीक्षक

भाजपच्या नगर शहरजिल्हाध्यक्ष निवडीसाठी बागडे निरीक्षक

भाजपांतर्गत निवडणूक : बागडेंची निरीक्षक म्हणून नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप पक्षांतर्गत निवडणुकीसाठी नगरकरीता नियुक्त केलेले निरीक्षक खा. गिरीष बापट यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांच्याऐवजी आ. हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आली. आता हरिभाऊ (नाना) बागडे हे नगर शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड करणार आहेत.

- Advertisement -

भाजपांतर्गत तालुकाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. काही तालुक्यांच्या अध्यक्ष निवडीचा वाद झाल्याने तो वाद जिल्हा समितीकडे आला आहे. त्यानंतर नगर शहरजिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. माजी खासदार दिलीप गांधी हे नगर शहराचे तर प्रा. भानुदास बेरडे हे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहे. आता या दोघांना पुन्ह संधी मिळते की नवा अध्यक्ष पक्षाला मिळतो याकडे नगरकरांच्या नजरा लागून आहेत.

खा. गिरीष बापट यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे नगर शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडी माजी सभापती तथा आमदार बागडे यांच्या निरीक्षणाखाली होतील असे भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा महामंत्री सुरेश हळवणकर यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या