Monday, November 25, 2024
Homeनाशिकखेडगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीत फूट

खेडगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीत फूट

खेडगाव | वार्ताहर

तालुक्यातील खेडगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीत उभी फूट पडली असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी तालुकाध्यक्षाचा राजीनामा देत सेना, राष्ट्रवादीच्य भाजप काँग्रेसच्या गटातटाचा फायदा घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत फूट पडण्यास दिंडोरी तालुकातून सुरूवात झाली आहे. खेडगाव गटात खेडेगाव विकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

- Advertisement -

खेडेगाव गटात सहा उमेदवारांचे अर्ज असून अर्ज मागे घेण्याची आज दि. 4 अंतिम मुदत आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय जिल्हा नेत्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता जाहीर केला, त्यामुळे राष्ट्रवादीत संताप निर्माण झाला. त्यातच खेडेगाव गटात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुकीत राष्ट्रवादिच्याच अंतर्गत विरोधी गटाने कारस्थान केल्याचे बैठकीत उघड झाले.

त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विजयात किंगमेकर ठरलेले भास्कर भगरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडी करत राष्ट्रवादीचा एबी फॉर्मन दिलेल्या पक्षाचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी पक्षाला रामराम ठोकत अपक्ष लढण्याचे जाहीर केल्याने शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व त्यांच्यात वन्स मोअर लढत रंगण्याची चिन्ह आहे.

दरम्यान विधानसभेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही बंडखोरी रोखण्यात शिवसेना नेतृत्वाला अपयश आले असून शिवसेनेचे पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे यांनी कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता अपक्ष निवडनुक लढवण्याचे जाहीर केले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले माकपचे साहेबरोब खराटे यांचे तर भास्कर भगरे, पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, विजय वाघ, परशराम गांगोडे यांचे अपक्ष म्हणून अर्ज आहे .भास्कर भगरे यांनी राष्ट्रवादी कडून तर सभापती एकनाथ खराटे, विजय वाघ यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केले होते मात्र एबी फॉर्म नसल्याने ते अपक्ष म्हणून अर्ज कायम आहे. आज अर्ज माघारीच्या मुदतीत कोण माघार घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या