नवी दिल्ली:
मुळचे पुण्याचे असेलेले ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या लष्करात बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे हे सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी आहेत.
- Advertisement -
नरवणे यांची नियुक्त जवळपास निश्चित झाली आहे. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात नरवणे यांनी व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदाची जबाबदारी हाती घेतली होती. त्याआधी ते सैन्याची पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी सांभाळत होते. भारताच्या चीनशी संलग्न सुमारे ४,००० कि.मी. लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी नरवणे यांच्या शिरावर होती.