Saturday, April 26, 2025
Homeनाशिक..अन मास्टर साई झाला एक दिवसाचा ‘आय पी एस’ अधिकारी

..अन मास्टर साई झाला एक दिवसाचा ‘आय पी एस’ अधिकारी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे तरुणांना व लहानग्यांना नेहमीच आकर्षण असते. या बाबतचे अनेक प्रसंग देखील समोर आले आहेत. ट्युमर झालेल्या मास्टर साई गणेश पांचाळ (वय 11 वर्षे) रा. उस्मानाबाद याने देखील विश्वास नांगरे-पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या पुन्हा याचा प्रत्यय आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

सध्या मास्टर साई एच सी जि मानवता कॅन्सर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचारा दरम्यान मास्टर साईने विश्वास नांगरे-पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, डॉक्टर राज नगरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. रुग्णालयातील डॉक्टर्सने ताबडतोब हालचाली करत मास्टर साईची इच्छा नांगरे-पाटील यांच्या पर्यंत पोहोचवली. नांगरे-पाटील यांनी ही आपल्या कामातून वेळ काढत त्याला भेटायचे ठरवले.

काही वेळा नंतर विश्वास नांगरे-पाटील यांच्या कार्यालयात भेट देण्यात आली. त्याला भविष्यात त्यांच्या सारखा अधिकारी होण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त यांच्या खुर्चीवर बसून प्रेरित केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी ट्युमर सारख्या मोठ्या आजाराशी लढत असलेल्या मास्टर साईला आकाश ठेंगणं झाले आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही...

0
पुणे(प्रतिनिधी) राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...