Saturday, April 26, 2025
Homeनाशिकभद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापा; सहा जुगारींची धरपकड, विशेष पथकाची कारवाई

भद्रकालीत जुगार अड्ड्यावर छापा; सहा जुगारींची धरपकड, विशेष पथकाची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

भद्रकाली परिसरात छापा आज (दि.3) दुपारी मारून पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने सहा जुगारींची धरपकड केली. तर त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व इतर असे साडे अट्टावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

सलीम वसीम शेख (व्दारका), इम्रान इजाज शेख(26, रा. खडकाळी), नितीन पुरुषोत्तम वाडेकर (32, रा. पेठरोड), गजानन नारायण भोरकडे (26, भीमवाडी, भद्रकाली), सुरेश बबन धोत्रे (40, रा. फुलेनगर), गणेश एकनाथ कुमावत (42, र, कुंभारवाडा) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

भद्रकालीतील तलावाडी परिसरात दुपारीअडीचच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलावाडी येथील सादीक मेमन यांच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या गाळ्यात हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने दुपारी छापा टाकला.

सर्व सहा संशयित यावेळी हे मटका जुगार खेळताना आढळले. त्यामुळे पथकाने या संशयित जुगार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 28 हजार 594 रुपयांचे जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल असा मु्द्देमाल जप्त केला आहे. तसेच या सहा संशयितांसह सादीक मेमन यांच्याविरोधातही भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...