Saturday, November 16, 2024
Homeनगरडमी बसवून पास झालेल्या तीन तलाठ्यांऩा अटक

डमी बसवून पास झालेल्या तीन तलाठ्यांऩा अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेत मूळ परीक्षार्थींच्या जागेवर डमी परीक्षार्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होती.

अंजली म्हस्के (बुलढाणा), विशाल इंगळे (यवतमाळ) व मंगेश दांडगे (जालना) हे तीन मूळ परीक्षार्थी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक निरीक्षक रवींद्र पिंगळे हे तपास करत आहेत. तलाठी व वाहनचालक या चार पदासाठी 12 जानेवारीला नगरमध्ये परीक्षा झाली. त्यासाठी 800 परीक्षार्थी परीक्षेला बसले होते.

- Advertisement -

तलाठी पदासाठी पात्र झालेले तीन परीक्षार्थी यांनी डमी परीक्षार्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या लक्षात आले. गुरूवारी सायंकाळी या मूळ परीक्षार्थींना जिल्हाधिकारी कार्यालयात बसून तपासणी करण्यात आली. परीक्षेच्या वेळेस महसूल विभागाने प्रत्येक परीक्षार्थींचे चित्रीकरण केले होते.

या चित्रीकरणाची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गुरूवारी सायंकाळी स्वतः तपासणी केली. मूळ परीक्षार्थींच्या आसन क्रमांकावर वेगळेच परीक्षार्थी पेपर देत असताना दिसत होते. त्यामुळे मूळ परीक्षार्थी हे परीक्षेला बसलेच नसल्याचे समोर आले. त्यातच या मूळ परीक्षार्थींकडे केलेल्या चौकशीत विसंगत माहिती पुढे आली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

डमी परीक्षार्थीमुळे मूळ परीक्षार्थींना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. विशाल इंगळे हा गुणवत्ता यादीत अव्वल आहे. त्याला 200 पैकी 182 गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल अंजली म्हस्के व मंगेश दांडगे यांना प्रत्येकी 160 गुण मिळालेले आहेत. डमी परीक्षार्थींना मूळ परीक्षार्थींच्या जागी बसवण्यासाठी रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या