दिल्ली – जगभारसह ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला. पंतप्रधान बोरिस जॉन्सन नंतर त्यांच्या आरोग्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री मैट हैनकॉक यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे ब्रिटनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ब्रिटनमध्ये सहा महिन्याचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्यमंत्री मैट हैनकॉक यांनी स्वत:ला आइसोलेट केले आहे.