राहुरी, शेवगाव, जामखेड, कर्जत, पाथर्डी आणि नगर तालुक्यात सुविधा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनूसार 2019-20 या वर्षासाठी जिल्ह्यात नाफेड मार्केटींग फेडरेशनच्या सभासद संस्थांमार्फत तूर खरेदी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर व 1 जानेवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 पर्यत नाव नोंदणीचा कालावधी निश्चित केला आहे.
जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यासाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ राहुरी, शेवगाव तालुक्यासाठी जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्था, शेवगाव, जामखेड तालुक्यासाठी पुण्यश्लोक कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड, कर्जत तालुक्यासाठी कर्जत तालुका खरेदी विक्री संघ मिरजगाव, पाथर्डी तालुक्यासाठी जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था पाथर्डी, नगर तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नगर व पारनेर तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.
शेतकर्यांनी तूर खरेदीसाठी सातबारा उतारा, चालू बँक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड या दस्तऐवजाची आवश्यकता असून नोंदणीत भरण्यात येणारी सर्व माहिती बरोबर असल्यास नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येईल. शेतकर्यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवून खरेदी केंद्रावर घेऊन यावा. माल खरेदी झाल्यानंतर त्वरीत ऑनलाईन काटा पट्टी घेण्यात यावी.
या योजनेमध्ये केवळ ऑनलाईन काटा पट्टी ग्राहय धरण्यात येईल. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. त्यामुळे बॅक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी. अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. जिल्हयातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन विभागातर्फे करण्यात आले आहे.
आणि सदस्यांमार्फत दबावतंत्राचा देखील वापर करण्यात येतो.