Saturday, July 27, 2024
Homeनगरवर्षांच्या शेवटी शहर वाहतूक पोलीसांकडून वाहचालकांवर कारवाई; एका दिवसात लाखाची वसुली

वर्षांच्या शेवटी शहर वाहतूक पोलीसांकडून वाहचालकांवर कारवाई; एका दिवसात लाखाची वसुली

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातून जाणारे अवजड वाहने, चारचाकी, दुचाकीविरोधात वर्षांच्या शेवटच्या दिवशी शहर वाहतूक शाखेने तपासणी मोहिम राबविली. मंगळवारी (दि. 31) रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील विविध भागात राबविलेल्या या मोहिमेत पोलिसांनी अडीचशे वाहन चालकांवर कारवाई करत 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

शहरातील पत्रकार चौक, एसपी ऑफिस चौक, जीपीओ चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक, जुने बसस्थानक, पुणे रोड, यांच्यासह शहरातील महत्वाच्या मार्गावरील केडगाव, शेंडी, विळद, वाळुंज बायपासवर वाहनचालकांना रोखून त्यांच्यावर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभर कारवाई केली. त्यात मोटारसायकलवरील हेल्मेट नसणे, ट्रिपल सीट, लायसन्स नसणे, नंबरप्लेट नसलेल्या तसेच, अल्पवयीन विद्यार्थी अशा 100 दुचाकी वाहनांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 62 हजार 900 रूपयांचा दंड वसूल केला.

- Advertisement -

अवजड वाहने, चारचाकी वाहनामध्ये प्रवास करताना सिल्टबेल्ट न लावणे, काळ्या काचा असणे, कागदपत्रे नसणे अशा 151 चारचाकी वाहनांवर कारवाई करत 32 हजार 300 रूपयाचा दंड वसूल केला आहे. वर्षांचा शेवटचा दिवस असल्याने शहर वाहतूक शाखेकडून पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाहनावर कारवाईची मोहिम राबविली होती. यासाठी शहर वाहतूक शाखेचे 25 ते 30 कर्मचारी व 20 होमगार्ड शहरातील विविध चौकात दिवसभर व रात्री बारा पर्यंत कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या