दिल्ली – कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत ११५९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून तर संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या १.०१ लाखाच्या पुढे गेली आहे.
येत्या शुक्रवारी इटली मधील संचारबंदी उठवण्यात येणार होती पण तेथील परिस्थिती बघता संचारबंदी वाढवण्यात आली आहे. असे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी जाहीर केले आहे. इटली हा कोरोनामुळे संचारबंदी करणारा पहिला देश होता.