Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशकपलचा नागरिकत्व कायद्याला विरोध; लढवली अनोखी शक्कल

कपलचा नागरिकत्व कायद्याला विरोध; लढवली अनोखी शक्कल

मुंबई : साधारण प्री वेडिंग फोटोशूट म्हटलं कि एक गोंडस कपल आठवत. त्यासोबतच्या विविध दृश्यांच्या माध्यमातून हे प्री वेडिंग शूट केले जाते. यामध्ये एखाद्या थीम वरही काम केले जाते. परंतु केरळातील हे कपल याला अपवाद ठरले असून या कपलने चक्क नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरला विरोध करणारे फोटोशूट केले आहे.

केरळमधील हि जोडी असून आशा आणि अरुण या दोघांचे लग्न ३१ जानेवारी २०२० मध्ये होणार आहे. तत्पूर्वी या दोघांनी फोटोशूट करत सीएए आणि एनआरसीचा विरोध केला आहे. तसेच फेसबुकवर फोटो शेअर करत त्याला आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे देशाने सुद्धा एकत्र रहावे असे कॅप्शन लिहिले आहे.

- Advertisement -

एकीकडे देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरच्या विरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला हिंसेचे वळण लागले असून यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या कपलने प्री-वेडिंग फोटोशूट मधून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोध केला आहे. हे कपल तिरुवनंतरपुरम येथील राहणारे असून त्यांनी नुकतेच त्यांचे हे प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. कपल जीएल अरुण गोपी आणि आशा शेखर असे त्यांचे नाव असून First Look Photography यांनी त्यांचे हे फोटोशूट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या