एक काळ असा होता की , लोकांना आकाशवाणीचं फार आकर्षण वाटत असे. गीतरामायण, बिनाका गीतमाला याप्रमाणे क्रिकेट सामना थेट मैदानावर जाऊन पाहणे शक्य होत नसे. दुधाची तहान ताकावर या न्यायानं रेडिओवरील सामन्याचे समालोचन (live Update) लोकांना आवडत असे हे समालोचन इंग्रजीतून होत असे.
इंग्रजी समालोचक अतिशय सहजपणे सामन्याच वर्णन करत यात भाषेची समृद्धी असे सर्व सामान्यांना कळायला हवं, याची खबरदारी घेतली जात असे. अशाच प्रकारे भारतीय प्रेक्षकांसाठी हिंदीतही कॉमेंटरी सुरू झाली. त्यामुळे इंग्लिध पेक्षा हिंदीत अधिक चांगल्या रीतीने सामना समजण्यास मदत झाली. यासाठी देशातील काहीकॉमेंटेटर्स किंवा समालोचकांचा आढावा घेणार आहोत.
हर्षा भोगले
यांचा जन्म १९ जुलै १९६१ हैद्राबाद येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण ओस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद आणि आयआयएम अहमदाबाद येथे झाले व्यवसायाने दूरदर्शनवर ते एक समालोचक सादरकर्ते म्हणून कार्यरत आहेत. हर्षा भोगले हे फ्रेंच प्राध्यापक एडी भोगले आणि मानसशास्त्र प्राध्यापिका शालिनी भोगले यांचे सुपुत्र आहेत.
हर्षा भोगले यांनी एक क्रिकेट खेळाडू म्हणून आपले करिअर सुरु केले. त्यांनी वयाच्या १९ वर्षी ऑल इंडिया रेडिओ येथे समालोचन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ईएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी अनेक कार्यक्रम होस्ट केले आहेत. २००८ आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे ते सल्लागार होते. ते एक पत्रकार देखील आहेत.
संजय मांजरेकर
संजय विजय मांजरेकर यांचा जन्म १२ जुलै १९६५ . मांजरेकर हे १९८५-१९८७ आतंरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त झाल्यावर समालोचन क्षेत्रात आपली कारकीर्द सुरु केली.
सौरव गांगुली
सौरव चंडीदास गांगुली असे यांचे पूर्ण नाव असून त्यांचा जन्म ८ जुलै १९७२ ला झाला आहे. भारताचा कर्णधार म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. भारताकडून ३०० पेक्षा अधिक सामने खेळणारा चौथा खेळाडू आहे.
२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी समालोचक म्हणून नवी इंनिंग खेळायला सुरुवात केली. गांगुली एक उत्कृष्ट समालोचक होण्यामागे त्यांचे क्रिकेटवरील ज्ञान आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व कारणीभूत आहे.
अंजुम चोप्रा
भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आणि खेळाडू आहेत. १२ फेब्रुवारी १९९५ मध्ये त्यांनी क्राईसचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यांनी १२ कसोटी आणि ११६ वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यानंतर त्यांनी समालोचन क्षेत्रात पदार्पण केले.
आयपीएल स्पर्धेच्या ८ व्या हंगामात त्या समालोचकांमध्ये सदस्य होत्या. २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकात त्या समालोचक होत्या.
रवी शास्त्री
रविशंकर जैधिता शास्त्री हे भारतीय संघाचे माजी खेळाडू समालोचक तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. १९८१-१९९२ अशी तब्बल ११ वर्षे भारतीय संघाचे सदस्य होते. ते धीम्या गतीचे गोलंदाज तसेच उत्कृष्ट फलंदाज होते.
रवी शास्त्री हे १५ जुलै २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. शास्त्री यांनी दूरदर्शन वर समालोचक म्हणून पदार्पण १९९५ मध्ये वर्ल्ड मास्टर्स टूर्नामेंट इन मुंबई या मालिकेतून केले.
सुनील गावस्कर
सुनील गावस्कर हे भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि आघाडीचे फलंदाज होते. शिवाय ते उत्कृष्ट समालोचकही आहेत. त्यांचा जन्म १० जुलै १९४९ मध्ये मुंबईत झाला.
१९८० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गावस्कर भारतातील प्रमुख समालोचकांपैकी एक आहेत. क्रिकेट विषयी सखोल ज्ञान तसेच हिंदी इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे.
कपिल देव
कपिल देव रामलाल निरवाज असे त्यांचे पूर्ण नाव असून भारताचे माजी कर्णधार होते. त्यांनी १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये सुमार कामगिरी करीत भारताला पहिला कप मिळवून दिला. सध्या समालोचक म्हणून काम करत आहेत.
अरुण लाल
अरुण लाल हे भारतीय संघाचे माजी खेळाडू तसेच एक समालोचक आहेत. १९८२ मध्ये मद्रास येथे श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. सामन्यात त्यांनी ६३ धावा केल्या. सुनील गावस्करांसोबत १५६ धावांची भागीदारी केली.
दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ५१ धावा केल्या पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. १९८७ मध्ये विंडीजविरुद्ध ९३ धावा तो त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक स्कोर आहे.
सचिन तेंडुलकर
सचिनच्या कुटुंबियांचे सचिन देव बर्मन हे आवडते संगीत दिग्दर्शक असल्याने सचिन असे नाव पडले. सचिनचा जन्म मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. शारदाश्रम शाळेत रमाकांत आचरेकर गुरुजींनी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर सचिन समालोचन क्षेत्रात काम करत आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णन
भारतीय संघाचे माजी खेळाडू तसेच राईट आर्म लेगस्पिन गोलंदाज आहेत. सध्या ते क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत आहेत. समालोचक म्हणून त्यांनी २००० साली पदार्पण केले.
सलील परांजपे, देशदूत नाशिक