Sunday, April 27, 2025
Homeनगरजुगारींच्या वादातून नगरमध्ये एकाचा खून

जुगारींच्या वादातून नगरमध्ये एकाचा खून

पाईपलाईन रोडवरील तागडवस्तीमधील घटना
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुगार खेळताना झालेेल्या वादातून नगरमध्ये एकाने दुसर्‍याला केल्या मारहाणातील एकाचा खून झाला आहे. ही नगर शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या तागड वस्तीमध्ये शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नंदकिशोर गणपत मंचरे (वय- 54 रा. पाईपलाईन) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर, सचिन नानासाहेब भोजने (रा. पाईपलाईन) असे खून करणार्‍या आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपी भोजनेला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाईपलाईन रोडवरील तागड वस्ती येथे एका घरामध्ये काही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात जुगार खेळत होते. जुगार सुरू असताना याठिकाणी असलेल्या नंदकिशोर मंचरे व सचिन भोजने यांच्यामध्ये वाद झाले. या वादाचे पर्यावसन भीषण हणामारीत झाले. ही हणामारी पाहून तेथील अन्य जुगार्‍यांंनी पोबारा केला.
दरम्यान यावेळी भोजने याने मंचरे याला लाथाबुक्क्यांनी छातीमध्ये जबर मारहाण केली. यामध्ये मंचरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक घायवट यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंचरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान खुनी सचिन भोजनेला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम तोफखाना पोलीस ठाण्यात सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terrorist Attack : आतापर्यंत ‘इतक्या’ पाकिस्तान्यांनी देश सोडला

0
जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतला असून, पाकिस्तानी...