Saturday, May 18, 2024
Homeनगरकारागृहातील आरोपीकडे सापडली नक्षल्यांशी संबंधित चिठ्ठी

कारागृहातील आरोपीकडे सापडली नक्षल्यांशी संबंधित चिठ्ठी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्न करणार्‍या एका बंदिस्त आरोपीकडे नक्षल्यांशी संबंधित बातमीचे कात्रण आणि एक चिठ्ठी सापडली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीची संपूर्ण माहिती काढून नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल पाठवला आहे. पावलस कचरू गायकवाड असे या बंदिवानाचे नाव आहे. गायकवाड याला सीआयसीएफमधून बडतर्फ करण्यात आले आहे.

गायकवाड याला पत्नीच्या नातेवाईकांवर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पारनेर पोलिसांनी अटक केली होती. त्याला जामीन न मिळाल्याने मागील काही महिन्यांपासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र गेटची चावी न मिळाल्याने त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. हा प्रकार इतर कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच कर्मचार्‍यांनी त्याला पकडले. कारागृहातील पोलीस कर्मचार्‍यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे नक्षलवादी हे तरुणांना भरती करुन कसे प्रशिक्षण देतात अशा आशयाच्या एका वृत्तपत्राची बातमी आढळून आली.

तसेच त्याच्या आई आणि मुलीच्या नावे लिहलेली एक चिठ्ठीही सापडली. त्या चिठ्ठीमध्ये मला तुमची खूप आठवण येत आहे. पण आता माझी वाट पाहू नका. मी माझा मार्ग निवडला आहे असा मजकूर लिहला होता. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्याची माहिती घेत यासंदर्भात नक्षलवाद विरोधी अभियानाकडे याचा अहवाल पाठवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या