Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या २३०१ वर; ५६ रुग्णांचा मृत्यू तर, १५५ जणांना डिस्चार्ज

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २३०१ वर; ५६ रुग्णांचा मृत्यू तर, १५५ जणांना डिस्चार्ज

दिल्ली : कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण २ हजार ३०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी कोरोना विषाणूमुळे ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १५५ कोरोनाबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील नागरिक घाबरले आहेत. देशात गेल्या २४ तासांत एकूण २३५ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

देशात कोरोनाचे थैमान घातले असताना १८ मार्च रोजी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते.

त्यापैंकी काहीजण कोरोनाबाधीत असून त्यांच्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या