नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान दिल्लीकरांनी आपच्या बाजूने कौल दिला आहे. यामध्ये आपला ५७ तर भाजपाला १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काँग्रेसने भोपळाही फोडता आला नसल्याचा आतापर्यंतच्या निकालावरून दिसून येत आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे काम अजूनही सुरू आहे. आम आदमी पार्टी (आप) मोठ्या प्रमाणात बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या निकालावरून दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि कॉंग्रेसची सफाई केली आहे. एकूण मतदान झालेल्या ५० टक्क्यांहून अधिक मते आपला मिळाल्याने केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा अंदाज आहे.l
आम आदमी पार्टी (आप) ४५ ते ५५ जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. साधारण एक वाजेपर्यत सर्व निकाल हाती येणार असून त्यावेळी दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती हे लक्षात येईल.