Monday, May 27, 2024
Homeनगरजिल्हा बँक निवडणूक अंतिम मतदार यादी 11 मार्चला

जिल्हा बँक निवडणूक अंतिम मतदार यादी 11 मार्चला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी 11 मार्च 2020 रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी वसंत पाटील यांनी दिली.

सभासद संस्थेचे ठराव करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे ठराव 31 जानेवारीअखेर पाठवावे लागणार आहेत. जिल्हा सहकारी निवडणूकअधिकारी यांना प्राप्त संस्था प्रतिनिधींचे ठराव 1 फेब्रुवारी पर्यंत बंँकेस द्यावे लागणार आहेत. बँकेने प्रारूप यादी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना 7 फेब्रुवारीपर्यंत सादर करावयाची आहे.

- Advertisement -

त्यानंतर निवडणूक अधिकारी ही यादी 17 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करतील यावर आक्षेप असल्यास ते 26 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येतील. या आक्षेपांवर 6 मार्चला निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर 11 मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याहीक्षणी बँकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या