Thursday, May 30, 2024
Homeनगरफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून होऊ शकते आर्थिक फसवणूक

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून होऊ शकते आर्थिक फसवणूक

नगर सायबर सेलकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनामुळे लॉकडाऊन असल्याने मोठ्या प्रमाणात लोक घरातच आहेत. घरामध्ये असलेल्या लोकांकडून सध्या करमणूक साधन म्हणून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जात आहे. यामुळे हॅकर्सने आपला मोर्चा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपकडे वळविला आहे. अकाउंट हॅक करून पैशाची मागणी करणे, अश्लील स्वरूपात फोटो तयार करून तो व्हायरल करणे असे उद्योग हॅकर्सने सुरू केले असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन नगर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी केले आहे.

- Advertisement -

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात करोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या काळात नागरिकांकडून फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. परंतु अपूर्ण माहितीमुळे बर्‍याच नागरिकांचे फेसबुक हॅक होऊन त्याद्वारे आर्थिक फसवणूक व अश्लील फोटो, मेसेज पाठवून नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. करोनामुळे लॉकडाऊन असल्याने याचा फायदा घेऊन परराज्यातील गुन्हेगार हे नागरिकांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्याचे नियंत्रण स्वतःकडे घेतात व सदर अकाउंटमधील संपर्क यादीतील नंबरवर संपर्क साधून मला पैशाची अंत्यत गरज आहे, असे मेसेज पाठवून सुरुवातीला पाच ते 10 हजार रुपयांची मागणी करतात व त्या सोबत बँक अकाउंट नंबर देतात.

काही नागरिक कुठलीही खात्री न करता सदर बँक अकाउंटवर पैसे भरतात यामधून फसवणूक केली जाते. तसेच, व्हाट्सअ‍ॅप स्टेटस, डीपीवर असलेले महिलांचे फोटो एडीटींग करून अश्लील स्वरूपात तयार केले जातेात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जाते व पैशाची मागणी केली जाते. यासाठी नागरिकांनी सुचनांचे पालन करून सावधानता बाळगावी असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

या सुचनांचे करावे पालन
फेसबुकचा पासवर्ड हा मोबाईल नंबर, जन्म तारीख असा ठेऊ नये, फेसबुकचा पासवर्डमध्ये वेळोवेळी बदल करावा, फेसबुक प्रोफाईलमध्ये प्रायव्हसी सेंटीगमध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर सार्वजनिक होणार नाही अशी सेंटीग करावी, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमधील प्रायव्हसी सेंटीगमध्ये बदल करून फोटो, पोस्ट, कमेंट बाबत ओन्ली फ्रेंड्स सेटिंग करून घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या