Thursday, May 15, 2025
Homeदेश विदेशगगनयान मोहिमेसाठी इस्रो देणार स्टार्टअपला प्राधान्य

गगनयान मोहिमेसाठी इस्रो देणार स्टार्टअपला प्राधान्य

बंगळुरू – गगनयान मोहिमेसाठी इस्रो देशातील स्टार्टअपला प्राधान्य देणार आहे. अंतराळवीरांसाठी अन्न आणि औषधे स्टार्टअप्सकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त भारताच्या या पहिल्या मानवी मोहिमेसाठी वापरले जाणारे अंतरिक्षयान आणि इंजिनसाठी लागणारी उपकरणांच्या निर्मितीसाठी देखील स्टार्टअप्सची मदत घेतली जाणार आहे. संशोधन आणि शैक्षणिक संस्थांना या मोहिमेदरम्यान संधी दिली जाईल, अशी घोषणा आम्ही अगोदरच केली आहे. आता या घोषणेचा विस्तार करीत ही संधी स्टार्टअप्सला देखील दिली जाईल, असे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.

- Advertisement -

गगनयान मोहिमेसाठी स्थानिक पातळीवर कमी खर्चात संशोधन करण्यासाठी मागील महिन्यात इस्रोने 17 तंत्रज्ञान संचांची ओळख पटवून संशोधकांना आमंत्रित केले आहे. यामध्ये अंतराळवीरांना आवश्यक असलेल्या खाद्यान्न आणि औषधांचा समावेश आहे. स्पेससूट, यानातील उत्सर्जनविरोधी सुरक्षा यंत्रणा, तसेच अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी आवश्यक यान स्टार्टअप्सकडून विकसित केले जाणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अंतराळकेंद्र स्थापन करणे, त्यासाठी बर्‍याचवेळा मानवाला अंतराळात पाठवावे लागेल, असेही इस्रोने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या मानवी मोहिमेचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी इस्रोने लहान लहान गट निर्माण केले आहेत.

नवीन कंपन्यांना भारतात येण्यासाठी या माध्यमातून संधी निर्माण झाली आहे, असे इस्रोच्या सुदूर संवेदन मोहिमेत सहभागी असलेली पहिली खाजगी कंपनी पिक्सेलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अवाइस अहमद यांनी सांगितले. भारतातील स्टार्टअप्स सध्या जैविक, अंतराळसंबंधित आणि रोबोटिक प्रयोग करीत आहेत. त्याचा या मोहिमेला निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रोने आपली बौद्धिक संपदा धोरणात्मक पद्धतीने विकसित करणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान मोहिमेत सहभागी होणार्‍या कंपन्यांना देणेही गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Update: आनंद वार्ता! मान्सून अरबी समुद्रात दाखल, केरळमध्ये १ जून...

0
पुणे | Pune उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला आहे....