दिल्ली – कोरोनामुळे जगभरात घबराट पसरली आहे. त्यातच कोरोनाचा वाढत्या धोक्याबद्दल चिंताग्रस्त होऊन जर्मनीतील हेसे राज्याचे राज्य अर्थमंत्री थॉमस स्फेफर यांनी आत्महत्या केली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 26 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5 लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. थॉमस यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याने जगभरला धक्का बसला आहे. कोरोणामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याने चिंताग्रस्त होऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.