प्रिय सचिन सर…
सर्वच मानायचे हार जेव्हा
चित्र पालटण्यास यायचास तूम्ही..
नक्षा उतरवून सर्वांचा तेव्हाच शांत व्हायचाच तूम्ही.. डुलतात आनंदात सारे पाहुन तुम्हाला लक्ष लक्ष नयनांचा तारा तुम्ही..कर्तृत्वाने जिंकलेस जग सारे,
रयत आम्ही तुमची आमचा राजा तूम्ही…!
सचिन सचिन सचिन..
तुम्ही क्रिकेटला घरा-घरात पोहचवले. एक वेळ अशी होती की तूम्ही आऊट झाल्यावर काही लोक टिव्ही बंद करत होते. तुम्हाला खरचं देव म्हणायला काहीच हरकत नाही. तुमच्या रेकाॅर्ड जवळ कुणी येत सुद्धा नाही. सगळ्यात जास्त रन्स असो, कि सगळ्यात जास्त शतक किंवा चौकार व षटकार सगळेच रेकाॅर्ड लाजबाब आहेत. ऑस्ट्रेलिया मधील एका चाहत्याने म्हटले होते.. अपराध तब करो जब सचिन बैटींग कर रहा हो क्योकी भगवान भी उस समय उनकी बैंटीग देखने मे व्यस्त होते है..!
खरचं प्रत्येकाच्या नशीबात नसतं हे सर्व..तुम्हाला तर भारतातील सर्वात्तम भारतीय नागरिक पुरस्काराने सुद्धा सन्मानीत करण्यात आले आहे. तूम्ही तर एक उत्तम खेळाडू आहेच, त्यासोबतच तूम्ही एक माणुसकीचा वजीर सुद्धा आहात. तुमचं नावं तर तुमच्या वडिलांचे प्रिय संगीतकार सचिन देव यांच्या नावावरून ठेवण्यात आले. १५ नोव्हें १९८९ साली मै खेलेगा… हीच ओळ तर तुमच्या जीवनाची जीवनदायनी ठरली. तुम्हाला तर १२५ कोटी भारतीयांच्या अपेक्षेचे ओक्षे होते. तुम्ही प्रत्येक बाॅल हा गनिमी काव्याने खेळलात..मला आठवतं तूम्ही खेळत असतांना रस्त्यावर, माॅलमध्ये किंवा थिएटर मध्ये कुठलीही गर्दी नसायची..तुमच्या उत्तम खेळीने भल्या-भल्यांचे काळजाचे ठोके सुद्धा थांबवले तूम्ही..तूम्ही खेळत असतांना मी किंवा माझ्या मित्र-परिवाराने एखादी गोष्ट केली..आणि त्यावेळेस नेमके तूम्ही आऊट झालात..तर ती गोष्ट आम्ही आयुष्यात तूम्ही खेळत असतांना कधीच केली नाही. तुमचा प्रत्येक चौकार, षटकार किंवा उत्तम खेळीला आनंदाने डोळे भरून यायचे. तूम्ही खेळत असतांना आम्ही कुठलेही काम करायचो नाही..अगदी पाणीसुद्धा प्यायचो नाही..इतके गुंग होऊन जायचो..तुमची खेळी म्हणजे..पुन्हा कधीही घडणारी नव्हती. सगळेच खेळाडू तुमचे कौतुक करतांना नेहमी म्हणायचे..आम्ही आमच्या आयुष्यात देव पाहिलायं..तो भारताच्या टिममध्ये चार नंबरवर खेळायला येतो.खुपदा तुम्ही सर्वांना त्यांचातले वाटला..
कुठलेही शतक किंवा पन्नाशी असो तूम्ही नेहमीच त्या मोकळ्या आकाशाकडे बघायचे जरी वडील गेले असले तरी ते नेहमीच तुमच्या हृदयात अजूनही आहेत. तूम्ही निवृत्त झाला तो दिवस आजही आठवणींच्या अश्रूंनी ओघळवतो. तुमची ती आयुष्याची २४ वर्ष सुरू असलेली घोडदौड त्या दिवशी पूर्णविराम घेणार होती.
भारताचे खेळाडू फलंदाजी करत होते. पण पहिल्यांदा हा संपूर्ण देश आपलेच खेळाडू आऊट व्हायची वाट बघत होता.. कारण सर्वांना त्या क्रिकेटच्या देवाला खेळतांना बघायचे होते. नेहमीच्याच उत्साहाने, नव्या विक्रमाने धावपट्टीवर तूम्ही खेळायला आलात..अनपेक्षीतपणे तुमचा झेल गेला आणि तूम्ही आऊट झालात…
कदाचीत त्या गोलंदाजाला ही वाईट वाटले असावे. शत्रूलाही वाईट वाटावे..असा दुनियादारीतला राजा माणूस आहात तूम्ही..कधीतरी असं घडेल की तुमचा रेकाॅर्ड मोडला जाईल..सर्वच तुम्हाला विचारतील..सर तुमचा रेकाॅर्ड मोडला गेला..त्यावर तुमचे उत्तर काय..तुमचे मिश्कील हास्य देत उत्तर असेल कोणता रेकाॅर्ड….खरचं हे सारं कसं जमलं तुम्हाला..एवढे सगळे रेकाॅर्ड असणाऱ्या तुमच्या लक्षात काय-काय राहील..तुमच्याबद्दल एक गोष्ट मात्र आयुष्यभर सर्वांच्याच लक्षात राहीली..ती म्हणजे निवृत्त होत असतांना..तुम्हाला विचारले होते बेस्ट पार्टनरशिप कोणासोबत..त्यावेळेस तूम्ही सुंदर शब्दांत उत्तर दिले होते..बायकोसोबतची पार्टनर शिप माझी सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप होती. त्यावेळेस वाटले खरं प्रेम असावं तर असं..!
गल्लीत खेळणारा प्रत्येक लहान मुलगा आजही तुमची जशीच्या तशी काॅपी करतो..तुम्ही उभे कसे राहता..तुम्ही कुठली बॅट वापरता..बॅट कशी पकडता..अगदी
सगळचं..कदाचित तुमच्या सारखं खेळणं त्याला जमतं नाही.पण तो नेहमीच मनाशीच पुटपुटतो..मला सचिन बनायचं..मला क्रिकेटचा देव बनायचं..लहानपणी आई नेहमी म्हणायची..क्रिकेट खेळून तुला काय सचिन बनायचं..अगदी आईला ही तूम्ही तोंडपाठ होता. देवा घरी गेल्यावर आम्हाला सर्वांना कळेलच देव काय असतो..पण आयुष्याच्या पलटावर आम्ही सर्वांनी तुमच्या रूपात देव पाहिला. ज्यांनी स्वत:च्या सुखासाठी कधी देवाला हात सुद्धा जोडले नाहीत..त्यांनी तुमच्या उत्कृष्ट खेळीसाठी अक्षरक्ष; देवाला हात सुद्धा जोडले..खरचं किती भाग्यवान आहात ना सर तुम्ही..!
सचिन सचिन सचिन हा तीन अक्षरी मंत्र विजयाचं बळ देतो पाठीवरती कौतुकाची थाप देतो वडिलांची आठवण देतो.
तूम्ही निवृत्त झालातं.आणि वेड्या चाहत्यांनी क्रिकेटला राम-रामचं ठोकला..!
खरचं सचिन पाजी मानलं राव तुम्हाला..!!!
तुमचाच एक चाहता…
– आकाश दिपक महालपूरे
मु.पो.गोंदेगाव ता.सोयगाव जि.औबाद
मो.नं..7588397772