Sunday, November 17, 2024
Homeनगरन्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी हवालदाराने घेतली लाच

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी हवालदाराने घेतली लाच

अहमदनगर (प्रतिनिधी) – न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा कोतवालीचा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला. गुरुवारी (दि. 26) रात्री भररस्त्यावर ‘लाचलुचपत’च्या पोलिसांनी ही कारवाई केली. अनिल अजिनाथ गिरिगोसावी असे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

गिरि गोसावीकडे एक गुन्हा तपासासाठी आहे. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे लागते. हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे यासाठी फिर्यादीकडेच सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच घेण्याची तडजोड झाली. रात्री अकरा वाजेच्या सुमारास इम्पिरिअल हॉटेलसमोर भररस्त्यात गिरिगोसावी यास पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

एकटेच की आणखी साथीदार!
कोतवाली पोलीस ठाणे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. लाच घेताना हवालदार पकडल्याने कोतवाली पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे. यातून पोलिसांची खाबूगिरी सुरू असल्याचेही समोर आले. गिरिगोसावी यांनी स्वत:साठीच लाच स्वीकारली की त्यात आणखी कोणी सहभागी होते, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या