Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशसलून, स्टेशनरी, दारू दुकानांबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

सलून, स्टेशनरी, दारू दुकानांबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सुटही देण्यात आली आहे. 4 मेपासून सुरु होणार्‍या लॉकडाऊनच्या तिसर्‍या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगू असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केंद्र सरकारने सलून, ब्युटीपार्लर, दारू दुकाने आणि पानटपर्‍या, स्टेशनरी दुकाने सुरू करण्यास काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये या सेवा 4 मे पासून सुरू होणार आहेत. अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असेल.
रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपर्‍या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्याचा निर्णय आज कळणार
केंद्र सरकारने सलून, ब्युटीपार्लर, दारू दुकाने आणि पानटपर्‍या, स्टेशनरी दुकाने सुरू करण्यास काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये या सेवा 4 मे पासून सुरू होणार आहेत. मात्र याबाबत अद्यापतरी राज्य सरकारकडून खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत आज अथवा उद्या राज्याकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या