Saturday, July 27, 2024
Homeनगरइस्त्रो सहलीसाठी 42 विद्यार्थ्यांची निवड अंतिम

इस्त्रो सहलीसाठी 42 विद्यार्थ्यांची निवड अंतिम

जिल्हा परिषद : फेबु्रवारीत करणार केरळकडे उड्डाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे यंदा देखील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील 42 विद्यार्थ्यांची इस्त्रो (विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, केरळ) या ठिकाणी सहल काढण्यात येणार आहे. या सहलीसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 42 विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात आली आहे. साधारण फेबु्रवारी महिन्यात हे विद्यार्थी केरळच्या दिशेने उड्डाण घेणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्त्रो याठिकाणी थेट क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा आनंद लुटता यावा, विज्ञान आणि अवकाश संशोधनाविषयी त्यांना माहिती मिळावी, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यामधून वैज्ञानिक, शास्त्रज्ञ तयार व्हावेत, या हेतूने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या प्रत्येक तालुक्यातून 3 याप्रमाणे 42 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना केरळ येथे असणार्‍या विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, याठिकाणी पाठविले होते.

यासाठी आधी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची विज्ञानविषयक निबंध स्पर्धा घेण्यात येते. यातून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांची तालुका पातळवर ऐनवेळी विषय देवून पुन्हा निबंध स्पर्धा घेण्यात येते. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून 9 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची जिल्हा पातळीवर मुलाखती घेण्यात येतात. ही प्रक्रिया शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागातील विज्ञान विषय शिक्षक यांच्या मार्फत करण्यात येते. अशा प्रकारे तिन वेगळवेगळ्या पातळीवर स्पर्धा घेवून त्यातून प्रत्येक तालुक्यातून तीन अशा 42 विद्यार्थ्यांची निवड गुरूवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पारपडली आहे.

यांची झाली निवड
मानसी गुंजाळ, खुशी शेख, आरती लावरे (राहाता), मयुरी आसने, प्रेरणा तांबे, आदिती कणसे (श्रीरामपूर), श्रेया घोडेराव, वृषाली बडे, गायत्री पंडित (शेवगाव), प्रणाली तमनर, ईश्वरी बनकर, महेश बिडगर (राहुरी), कोमल मरकड, वैष्णवी वारकड, शिवाली सातपुते (पाथर्डी), समर्थ वाघ, वेदिका साळुंके, ऋषिकेश गदादे (कर्जत), साक्षी कराळे, कृणाल कवडे, अस्मिता नागरगोजे (नगर), कार्तिक चव्हाण, श्रीकांत ताके, बागवान अन्सार (नेवासा), प्रज्ञा गायकवाड, पल्लवी बढे, पुजा पवार (संगमनेर), वेदप्रकाश मते, सुजाता टकले, वैष्णवी आढाव (पारनेर), संज्योत आवारी, श्रुतिका वाकचौरे, ज्ञानेश्वरी तळेकर (अकोले), साक्षी आहेर, श्वेता लोणारी, श्रध्द हिंगे (कोपरगाव), आनंद ढवळे, वैष्णवी बोरूडे, संस्कृती काळे (श्रीगोंंदा), भागवत आढाव, दिक्षा पवार, अक्षय बोराटे (जामखेड) या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या