नवी दिल्ली : मागील दोन दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. यात उत्तर भागात हिमस्खलन झाल्याने तीन जवान शहिद झाल्याची घटना घडली आहे. तर एक जवान अद्याप बेपत्ता असल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.
दरम्यान देशभरात वातावरण बदलले असून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे कुपवाडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिमस्खलन होत आहे. येथील माच्छिल सेक्टरमध्ये जवान कार्यरत असतांना बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन जवान शहीद झाले. तर अन्य एक जण बेपत्ता आहे. लष्कराने या ठिकाणी बचावकार्य सुरु केले आहे. अनेक जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे या भागातील बांदीपोरा आणि गांदरबल जिल्ह्यात देखील हिमस्खलन झाले आहे. अनेक नागरिकांची घरे या बर्फाच्या दिग्र्याखाली दाबली गेली आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी स्तहनिक प्रशासन आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. अद्याप पाच ते सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे तर अनेकजण ढिगाऱ्याखाली खाली दाबले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.