Saturday, November 16, 2024
Homeनगरकुकडी कारखाना निवडणूक बिगूल वाजले

कुकडी कारखाना निवडणूक बिगूल वाजले

प्रारूप मतदारयादी जाहीर, अंतिम यादी 17 फेब्रुवारीला

श्रीगोंदा (ता. प्रतिनिधी)– श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर झाली. त्यात 13 हजारांच्या आसपास सभासद अपात्र ठरल्याने त्यावर हरकतीचा पाऊस पडणार असतानाच दिनांक 23 जानेवारी रोजी सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप पाटील सहकारी (कुकडी) कारखाना निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक अधिकारी बाजीराव शिंदे यांच्या सहीने प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून प्रारूप मतदारयादीवर हरकती साठी 1 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे.

- Advertisement -

तालुक्यातील कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कुकडी कारखान्याची सत्ता सध्या माजी आमदार राहुल जगताप यांच्या ताब्यात असून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांनी मागील पंचवार्षिक निवडणूक जगताप यांच्या विरोधात लढवली होती. त्याच वेळी घनश्याम शेलार देखील जगताप यांच्या विरोधात होते. आता मात्र शेलार जगताप एकत्र आहेत.

आता प्रारूप मतदारयादीवर हरकतीसाठी 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशी मुदत आहे. अंतिम मतदार यादी 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या निवडणुकीत आता माजी आमदार राहुल जगताप विरुद्ध विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांत लढाई होण्याचे संकेत आहेत. मागील पंचवाषिक निवडणुकीत देखील अशीच लढत झाली होती. जगताप विरुद्ध पाचपुते यांच्यात होणारी ही लढत महत्त्वाची असली तरी यावेळी जवळजवळ 5692 सभासद अक्रियाशील आहेत.

नागवडे कारखाना आणि कुकडी कारखाना या दोन्ही कारखान्यांचे गळीत हंगाम यावर्षी सुरूच झाले नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना इतरकारखान्यांच्या दारात ऊस देण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असताना तालुकयातील दोन्ही सहकारी कारखाने बंद असल्याचा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.

6469 सभासद क्रियाशीलच्या यादीत
हिंगणी गटात आठ गावे असून 984 सभासद क्रियाशील, राजापूर गटात 10 गावे 1176 क्रियाशील सभासद, पिंपळगाव पिसा मध्ये आठ गावे 1466 सभासद, कोळगाव गटात 10 गावे 1434 सभासद, भानगाव गटात 58 गावे 1409 सभासद असे एकूण 94 गावात 6469 सभासद क्रियाशील आहेत. अक्रियाशील सभासद 5692 आहेत. तर 140 सभासदांकडे अनामत येणे आहे तर 427 सभासद मृत असल्याचे कारखान्याचे एम. डी. मरकड यांनी सांगितले.

सेवा संस्था मतदारसंघात लगेच जगतापांचा झेंडा
कुकडी कारखाना निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघात केवळ पाच सहकारी संस्था मतदानासाठी पात्र आहेत. त्यात माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणोती जगताप यांच्या नावे रेणुकादेवी सेवा संस्थेचा ठराव असल्याने या सेवा संस्था मतदारसंघात प्रणोती जगताप यांचे प्रतिनिधित्व असल्यांने त्यांचे संचालक पद आज निश्चित झाले आहे. इतर चार संस्था मध्ये तुळशीदास सेवा संस्था, मुंगूसगाव सेवा संस्था, एरंडोली सेवा संस्था, सुरोडी सेवा संस्था व रेणुकादेवी सेवा संस्था यांचे ठराव आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या