Saturday, May 4, 2024
Homeनगर30 तारखेपर्यंत लॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा

30 तारखेपर्यंत लॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा

काळाबाजार, साठेबाजी करणार्‍यांवर कारवाईचा जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानूसार सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमध्ये आणखी काय वाढ करावयाची याबाबत जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात संगमनेर, मुकूंदनगर (नगर), आमलगीर (नगर) आणि जामखेड या ठिकाणी हॉटस्पॉट 14 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आला असून या ठिकाणी नागरिक घराच्या बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येत आहे. यासह जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात किरणा यासह अन्य वस्तूची साठेबाजी, काळा बाजार होत असल्यास त्या विरोधात भरारी पथके तयार करण्यात आला असून असे प्रकार घडत असल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी, संबंधीतांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोलीसांची नाकाबंदी सुरू असून अनेक ठिकाणी जिवनाश्यक वस्तू वगळता अन्य सर्व बंद ठेवण्यात येत आहे. अनेक गावात दिवसा आड अथवा आठवड्यातून दोन अथवा तीन दिवस भाजीपाला विक्री सुरू आहे. यासह दुधाचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यावर प्रशासनाचा भर असला तरी ग्रामीण भागात खासगी दूध संकलन चालकांकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या