Saturday, May 4, 2024
Homeनगरकडकडीत बंदच्या काळात नांदुर्खीत नियम तोडणार्‍यांना महिला अधिकार्‍यांनी दिली शिक्षा

कडकडीत बंदच्या काळात नांदुर्खीत नियम तोडणार्‍यांना महिला अधिकार्‍यांनी दिली शिक्षा

नांदुर्खी (वार्ताहर)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राहाता तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आलेल्या आहे. नादंदुर्खीतही या कडकडीत बंदच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणारांना तलाठी व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी उठबशा काढायला लावून शिक्षा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा आदेश दिला. संचारबंदी असतानाही लोक विनाकारण रस्त्यावर फिरतात व तोंडाला मास्क लावत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. नांदुर्खी गाव शंभर टक्के बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नांदुर्खी चौफुली रस्त्यावर व परिसरामध्ये जे कुणी नागरिक रस्त्यावर फिरत असेल व मास्क लावलेले नसेल त्यांना महसूल विभागाचे अधिकारी कामगार तलाठी श्रीमती देवकर, ग्रामसेवक श्रीमती आवटे यांनी जागेवर थांबवून उठबशा काढायला लावल्या व परत रस्त्याला दिसल्यास तुमची गाडी जप्त होईल,

- Advertisement -

पुढील शिक्षेस तयार रहा अशी तंबी दिली. याचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. ही कारवाई करत असताना महसूल कर्मचारी दिपक वाघे, गोसावी योगेश, अर्जुन आरणे, पुंजाहरी गोसावी प्रशासनाला सहकार्य करणारे तरुण कार्यकर्ते सागर चौधरी, तुषार चौधरी, प्रल्हाद चौधरी यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या