Saturday, May 4, 2024
Homeनगरमहिला बचत गटांकडून कापडी मास्कची निर्मिती

महिला बचत गटांकडून कापडी मास्कची निर्मिती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा : दहा हजार मास्कची विक्री

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढत्या कोरोना संसर्गामुळे एकीकडे शहरी भागात मास्कचा तुटवडा जाणवत असताना नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मास्क कापडी निर्मितीचे काम हाती घेतले आहे. कॉटनच्या कपड्यापासून तयार करण्यात येणारे हे मास्क सर्वसामान्यासाठी किफायतशीर ठरत असून रोज धूवून ते वापरता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ ते दहा तालुक्यातील महिला बचत गटांनी 10 हजार मास्कची निर्मिती केली असून यातील जवळपास सर्व मास्कची विक्री झालेली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य आणि उत्पादनाची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटींगसाठी जिल्हास्तरावर मार्केटींग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे खर्‍याअर्थाने महिला बचत गटांच्या उत्पादनाला आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होतांना दिसत आहे.

सध्या जगभर कोरोना विषाणूचा विळखा वाढत असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कला मागणी आहे. अतिरिक्त मागणी आणि कमी उत्पादन यामुळे शहरी भागात मास्कचा काळाबाजार सुरू आहे. तर एकदा वापरून फेकून देणार्‍यात येणार्‍या (युज अ‍ॅण्ड थ्रो) मास्कच्या किंमतीत ग्रामीण भागात महिला बचत गटांनी तयार केलेल्या कॉटनच्या मास्कला मागणी वाढत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प आहे. मात्र, मास्कची निर्मिती करणार्‍या महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी 10 हजार मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कची किंमत 15 रुपये प्रतीपासून 20 रुपये आहे. काही महिला बचत गट केवळ मास्क तयार करून देण्याचे 2 रुपये शुल्क आकारात आहेत. मास्क तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य संबंधीतांकडून घेऊन त्यांना प्रती नग मास्क तयार करून देत आहेत. जिल्ह्यातील बचत गटांनी आतापर्यंत 10 हजारांच्या जवळपास मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे. यामुळे त्यांची 80 ते 95 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. या बचत गटांना पुढे मोठ्या ऑर्डर मिळाल्या असून त्यातून अडचणीच्या काळात या बचत गटांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.

श्रीरामपूरच्या बचत गटाला वर्षभर काम
श्रीरामपुरातील शिरसगावातील युगांधर महिला बचत गटाला गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटलकडून मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळत आहे. या बचत गटाने 14 वर्षापासून सेंट लूक हॉस्पिटल, 5 ते 7 वर्षांपासून कामगार हॉस्पिटल आणि 5 वर्षापासून तुपे हॉस्पिटला मास्क तयार करून देत आहेत. साधारणपणे 20 रुपयांना ते मास्क तयार करून देत आहेत.

शेवगाव तालुक्यातील रमाई व एकता बचत गटाने 3 हजार, राहाता तालुक्यातील मानवता आणि सिध्दी बचत गटाने 7 हजार, पाथर्डीतील पुजा तर जामखेडमधील कृष्णाई बचत गटाने 3 हजार मास्कची निर्मिती केलेली आहे. लॉकडाऊनमुळे काही बचत गटांची आकडेवारी अद्याप मिळालेली नूसन पुढील आठवड्यात संबंधीत आकडेवारी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या