Wednesday, May 21, 2025
Homeदेश विदेश‘किया मोटर्स’ची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स

‘किया मोटर्स’ची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स

मुंबई : कार उत्पादक कंपनी ‘किया मोटर्स’ भारतात दुसरी मल्टी पर्पज कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कार्निवल असे या कारचे नाव असून, फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये होणार्‍या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे.

- Advertisement -

कियाच्या भारतातील डिलर्सकडून या कारसाठी बुकिंग करण्यात येत असून, ही कार टोयोटा इनोव्हा क्रिस्टा यासारख्या प्रीमियम कारला टक्कर देणार आहे. भारतात कार्निवल एमपीवी 6, 7 आणि 8 अशा तीन प्रकारात उपलब्ध केली जाईल. टॉप मॉडेल 6 सिटर आणि सुरुवात एन्ट्री लेवलचे मॉडेल 8 सिटरचे असेल. कार्निवल एमपीवीमध्ये 2.2-लीटर, 4-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजीन 3,800 आरपीएम वर 200 बीएचपी एवढी शक्ती आणि 1,750-2,750 आरपीएम वर 440 एनएम पीक टॉर्क जेनरेट करते. हे इंजीन बीएस 6 शी कम्प्लायंट असणार आहे. या कारला 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारची किंमत 30 लाखांच्या घरात असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आयपीएलच्या बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्याचे अधिकृत वेळापत्रक (Schedule) भारतीय क्रिकेट नियामक (Indian Cricket Association) मंडळाने जाहीर केले आहे....