Monday, March 31, 2025
Homeदेश विदेशलॉकडाऊन : पत्नीला खांदयावर घेऊन पतीचा २५७ किमी पायी प्रवास

लॉकडाऊन : पत्नीला खांदयावर घेऊन पतीचा २५७ किमी पायी प्रवास

मुंबई : लॉक डाऊन आज तिसरा दिवस असून मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरामधून नागरिक घरी जाण्यासाठी पायपीट करियर आहेत. अशातच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत असून एका पतीने आपल्या पत्नीला खांदयावर घेत घर गाठण्यासाठी २५७ किमीचा पायी प्रवास सुरु केला आहे.

दरम्यान देशभर पुकारलेल्या लॉकडाऊन मुळे देशातील मजुरांची जिंदगी लॉक डाऊन होण्याची वेळ आली आहे. लोंढेच्या लोंढे संध्या वेगवगेळ्या रेल्वेस्थानक, महामार्ग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशातच गावी जाण्यासाठी नागरिक पायपीट करीत आहेत. एक असाच फोटो सध्या व्हायरल होत असून या तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

या फोटोत एक तरुण आपल्या पत्नीला खांदयावर घेत पायी प्रवास करतो आहे. हा तरारून अहमदाबाद येथून निघाला असून बांसवाडा असा २५७ किमीचा प्रवास करणार आहे. या तरुणाची पत्नीच्या पायाला फॅक्चर असल्याने ती चालू शकत नसल्याची माहिती आहे. गुजरात येथे मजुरी करणाऱ्या तरुणावर कामधंदा नसल्याने उपाशी राहण्याची वेळ आल्याने तो अहमदाबाद मधून राजस्थानातील बांसवाडा असा प्रवास करतो आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या