मुंबई : पंढरपूरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. मंदिर व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आता या मंदिराच्या समितीने आजपासून पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीने यापूर्वीच याबाबत निर्णय घेतला होता. त्यावर आजपासून अमंलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. अशावेळी अनुचित घटना मंदिर परिसरात घडतात. यामुळे मंदिराच्या सुरक्षेसाठी हा पाऊल उचलण्यात आले आहे. कारण मंदिरात भाविक आल्यानंतर फोटो काढणे, सेल्फी काढणे तसेच मोबाईलवर बोलणे यांसारख्या गोष्टी करतात.
त्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यासाठी म्हणून गाभा-यात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोबाईल ठेवण्यासाठी समितीने स्वतंत्र लॉकरची व्यवस्थाही केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे मंदिरची सुरक्षितता वाढणार आहे. तसेच अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. भाविकांच्या मोबाईल सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासाठी प्रत्येकी दोन रुपये आकारले जाणार आहेत.