Thursday, May 1, 2025
Homeमहाराष्ट्र‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे; शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक

‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे; शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी ठाकरे यांची वर्णी लागली आहे. रश्मी ठाकरे या आजपासून संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. यामुळे शिवसेनमुखपत्राच्या त्या पहिल्या महिला संपादक म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामनाचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर सामनाची जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे यापूर्वी अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

९० च्या दशकात आपले विचार,राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ मध्ये ‘सामना’ दैनिकाची सुरुवात केली होती. त्याच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर, ‘हा’ विभाग आहे...

0
मुंबई | Mumbai  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या...